Question tag and its basic rules
with examples
|
|
|
QUESTION
TAG ( प्रश्न
सूचक शद्धसमूह) |
Question
Tag म्हणजे काय ? |
वाक्याच्या
शेवटी वाक्याचा मतितार्थ योग्य आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी जो प्रश्न
सूचक शब्दसमूह वापरतात त्यास Question
Tag असे म्हणतात. |
स्पष्टीकरण- Question Tag म्हणजे प्रश्न सूचक शब्द
समूह पुरक प्रश्न किंवा उपप्रश्न होय. Question tag मध्ये प्रामुख्याने दोन
व्यक्तीचा संबंध येतो एक बोलणारा व दुसरा ऐकणारा. बोलणाऱ्याच्या मताशी ऐकणारा
सहमत असतो तेव्हा अशा विधाना वर बोलणाऱ्या कडून अधिक जोर दिला जातो.
प्रामुख्याने चर्चा गप्पागोष्टी करतांना Q. T चा वापर करण्यात येतो. |
उदा : तो नेहमी भांडत असतो, नाही
का? |
नाही का यालाच मराठीत उपप्रश्न असे म्हणतात. |
अभ्यासाच्या
दृष्टीने Q. T चे
सर्वसाधारणत: तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. |
१) सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्ये |
२) सहाय्यकारी क्रियापदे नसणारी वाक्य |
३) आज्ञार्थी वाक्ये |
Question Tag करण्याचे
सर्वसामान्य नियम : |
१) वाक्य जर होकारार्थी असल्यास तर Q. T. नकारार्थी
करावा. |
२)
वाक्य जर नकारार्थी असल्यास तर Q.T. होकारार्थी करावा. |
३) Q. T. नकारार्थी करतांना not चे
नेहमी n't असे
अल्परूप करून लिहावे. |
४) वाक्यात जर सर्वनाम असेल तर ते Q.T. मध्ये
पुन्हा घ्यावे - सर्वनामें I, we, you, he she, it , they |
५) जर दिलेल्या वाक्यात सर्वनाम नसेल तर
वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचनाला अनुसरुन सर्वनाम लिहावे. |
i) कर्ता
पुलिंगी असेल तर he घ्यावे. |
ii)
कर्ता स्त्रीलिंगी असेल तर she घ्यावे. |
iii)
कर्ता अनेकवचनी असेल तर they घ्यावे. |
iv)
कर्ता नपुंसकलिंगी असेल तर it घ्यावे. |
v)
कर्ता no one असेल तर any one घ्यावे. |
६) Q. T. करणाऱ्या
वाक्याच्या शेवटी स्वल्पविराम द्यावा आणि मग त्या वाक्या पुढे Q.T. जोडावा
जोडावा. |
७)
शेवटी प्रश्नचिन्ह देऊन केलेल्या Q. T खाली अण्डरलाईन मारावी. |
1)सहाय्यकारी
क्रियापदे असणारी वाक्य : |
सहाय्यकारी
क्रियापदे पुढीलप्रमाणे आहेत: |
i) वर्तमानकाळी : |
am, is, are, have, has, can, do,
does, may, must |
ii) भूतकाळी : |
was, were, had, could,
did, might, must |
iii) भविष्यकाळी- |
shall, will |
iv) भूत भविष्यकाळी- |
should , would |
नियम- वाक्यात जर वरील सहाय्यकारी क्रियापदे आली तर
Q.T. मध्ये
त्यांचा पुन्हा उपयोग ( वापर ) करावा. |
1)Rama
is working always, isn't he? |
2)
It is not a geography class, is it? |
3)We
didn't go to him, did we? |
२)
सहाय्यकारी क्रियापदे नसणारी वाक्य : |
नियम- वाक्यात जर
सहाय्यकारी क्रियापदे नसल्यास Q. T. ची सुरुवात do, does किंवा dld ने करावी. |
i) वाक्य
वर्तमानकाळी असल्यास do किंवा
does घ्यावे. |
ii)
वाक्य भूतकाळी असल्यास did घ्यावे. |
उदा- |
1)
Hari meets his friend now, doesn't he? |
2)
They visited the school, didn't they ? |
3)आज्ञार्थी
वाक्याचा Q.T.करणे : |
नियम- आज्ञार्थी वाक्याच्या Q T. नेहमी
will you असा
करावा. |
1)
Bring me a hot cup of tea, will you? |
2)
Tell me you now, will you? |
3)
Please come with me now, will you? |
|
|
|
|
|
|
You
may like these posts
|
No comments:
Post a Comment